घोडेमुख जत्रोत्सवाला जनसागर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सावंतवाडी : कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख अर्थात कोब्यांच्या जत्रौत्सवात आज शेकडो भाविक सहभागी झाले. मातोंड-पेंडूर येथे हा सोहळा झाला.

सावंतवाडी : कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख अर्थात कोब्यांच्या जत्रौत्सवात आज शेकडो भाविक सहभागी झाले. मातोंड-पेंडूर येथे हा सोहळा झाला.

जिल्हाभरातून असंख्य भाविकांच्या गर्दीने आज श्रीदेव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून गेले होते. मातोंड आणि पेंडूर या दोन गावांच्या सीमेवरच श्री देव घोडेमुखाचे देवस्थान आहे. शिव मार्तंडेश्‍वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान प्रवेशद्वारापासून 700 मीटर चढून गेल्यावर डोंगरावर आहे. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या जत्रौत्सवाचा आज मोठा जनसागरच लोटला. आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्रीदेवघोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरवात झाली. या जत्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून चाकरमानीही मुंबई, गोवा, कर्नाटक येथूनही मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. आज सकाळी एस. टी व बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.

भक्‍तांच्या हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या मातीच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास त्या अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंडच्या देवस्थानच्या देवदीपावली दिवशी सातेरी मंदिरात मांजी बसते. त्यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर होत असते. आज पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जात्रौत्सवादिवशी सकाळी 9 वाजता गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भुतनाथ व पावणाई या देवाच्या तरंगकाठ्यासह घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून आले. त्यानंतर श्रीदेव क्षेत्रात केळी व नारळाचा नवस दाखविण्यात आला.

भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखविण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने व भावनेने कोब्यांचा बळी देण्यासाठी येथील परिसरात दाखल झालेला भाविक आपल्या मनोकामना गावकाऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरुपात श्रीदेव घोडेमुखाजवळ मांडत होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने डोगर उतारावरूनच कोंब्याच्या बळी देण्याचा कार्यक्रमाला सुरवात झाली. जवळपास 20 ते 25 हजार कोंब्याचा बळी जत्रौत्सवात देण्यात आला. सायंकाळी हा बळी देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना झाले.

Web Title: rush for ghodemukh jatra in konkan