सचिन अहिर सेनेत गेल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

वेंगुर्ले - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. 

वेंगुर्ले - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. 

श्री. जाधव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी श्री. जाधव यांना श्री अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. 

श्री. जाधव म्हणाले, मुबंईमध्ये सचिन अहिरांचा कधी प्रभाव पडला  नाही. गेली दहा वर्षे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. पण त्यांनी राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी काहीही केलेले नाही. मुबंईमध्ये महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आणण्यासाठीही त्यांनी फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही. विधानसभा आमदार, खासदार, निवडुन आणण्यासाठी त्यांचा कधीही प्रभाव पडला नाही. जरी ते शिवसेनेमध्ये गेले तरी राष्ट्रवादीला चिंता करण्याचे काही कारण नाही. जे सोडून जातात त्यांची चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीही करत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीही यावर फारसे लक्ष देईल असे वाटत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Ahir enter in ShivSena Bhaskar Jadav comment