

Sakal Impact Forces Administration into Action
Sakal
पाली : पाली अंबा नदी पुलाजवळ थेट जैववैद्यकीय घातक कचरा टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सकाळने गुरुवारी (ता. 8) बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रकरणात प्रशासन खडबडून जागे झाले असून गुरुवारी (ता. 8) पाली नगरपंचायत व मेडिकल असोसिएशनची तातडीची बैठक पार पडली. तसेच पालीतील खासगी क्लिनिकची तपासणी होणार असून नोंदणी देखील सक्तीची करण्यात आली आहे.