Devgad Hapus : सावधान! बाजारात 'देवगड'च्या नावाखाली कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री?

देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
Devgad Hapus
Devgad Hapusesakal
Summary

देवगड हापूसचा (Devgad Hapus) हंगाम सुरू झाला असून सध्याचा दर ८०० ते १२०० रुपये डझन असा आहे.

कुडाळ : हापूस आंब्याचा (Konkan Hapus Mango) हंगाम सुरू झाला असून, मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी काही व्यापारी आंब्याची विक्री करत आहेत. मात्र, देवगड हापूसच्या (Devgad Hapus) नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचा संशय ग्राहक व्यक्त करत आहेत.

सध्या मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अनेक ठिकाणी छोटे-छोटे स्टॉल्स लावून हापूस आंब्याची विक्री होत आहे. परंतु, लहान फळ आणि किंमतही कमी असा असा हापूस आंबा नक्की देवगड हापूस का? असा प्रश्न पडत आहे. कारण विक्रेते कणकवली येथील स्थानिक असल्याचा सांगत आहेत. मात्र, त्यांची बोलीभाषा मराठी आणि कन्नड मिश्रित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Devgad Hapus
'गंजिफा'सह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून 'जीआय' मानांकन; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

देवगड हापूसचा (Devgad Hapus) हंगाम सुरू झाला असून सध्याचा दर ८०० ते १२०० रुपये डझन असा आहे. मुख्य म्हणजे कर्नाटकी हापूस आणि चवीत मोठा फरक असतो. सामान्य ग्राहकाला मात्र याचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्गावरून पुणे, मुंबई किंवा अन्य भागात जाणाऱ्या पर्यटकांना या देवगड हापूस आंब्याची ओळख पटलेली आहे. त्यामुळे साहजिकच स्थानिक देवगड किंवा रत्नागिरी हापूस व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

Devgad Hapus
Kolhapur Lok Sabha : संजय मंडलिकांना मतदान म्हणजे स्व. सदाशिवराव मंडलिकांना वंदन; मुश्रीफांचं मतदारांना भावनिक आवाहन

अशी करा पारख...

रत्नागिरी किंवा देवगड हापूस या आंब्याचे साल कर्नाटकी हापूस आंब्याच्या तुलनेत पातळ असते. कर्नाटक हापूसचे साल काही प्रमाणात जाड असते. त्यामुळे दोन्हीतील फरक ओळखायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. कर्नाटकी हापूस हा बाजारात लवकर दाखल होतो तो उशिरापर्यंत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com