या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजापूर : सांगलीहून राजापूरला येत असताना अणुस्कुरा घाटामध्ये (Anuskura Ghat) काल सकाळी १०.३० च्या सुमारास राजापूर एसटी (Rajapur ST Bus) आगाराच्या गाडीचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने डोंगराला धडक बसून अपघात झाला. यामध्ये एसटीचालक एस. आर. कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत डोंगराच्या दिशेने गाडी नेली, अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती.