सिंधुदुर्ग : निराधार अनुदान योजनेच्या नव्या समित्यांमध्ये 'यांचा' समावेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

शासनाने दिलेल्या आदेशानुसार व पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुकास्तरीय नवीन समित्या गठित केल्या आहेत.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - शासनाने दिलेल्या आदेशानुसार व पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तालुकास्तरीय नवीन समित्या गठित केल्या आहेत. त्यानुसार तालुकाध्यक्ष म्हणून नव्याने निवड करण्यात आली आहे. 

यात देवगड - मिलिंद साटम, कणकवली - प्रथमेश सावंत, मालवण - मंदार केणी, सावंतवाडी - अशोक दळवी, वेंगुर्ले - यशवंत परब, वैभववाडी - मंगेश लोके, कुडाळ - आत्माराम बंगे, दोडामार्ग - गणेशप्रसाद गवस यांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी 5 जूनला अध्यादेश काढत जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांच्या नव्या समित्या नियुक्त केल्या आहेत. त्याचवेळी जुन्या समित्यांचे अध्यक्ष व समिती सदस्यांची निवड रद्द केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार या नव्या निवडी झाल्या आहेत. या समितीत त्या-त्या तालुक्‍यांचे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि संजय गांधी नायब तहसीलदार हे शासकीय सदस्य राहणार आहेत. तर तहसीलदार समिती सचिव असणार आहेत. 

देवगड तालुका समिती 
देवगड तालुका समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद विठ्ठल साटम यांची निवड केली आहे. सदस्य म्हणून दीपक कदम, हर्षा ठाकुर, उमेय जठार, संजय देवरुखकर, शरद लोके, श्रद्धा आंबरेकर, प्रकाश गुरव, विश्वनाथ परब, सलाउद्दीन सोलकर अशी निवड केली आहे. 

कणकवली तालुका समिती 
कणकवली तालुका समितीच्या अध्यक्षपदी प्रथमेश मोहनराव सावंत यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून उत्तम तांबे, स्वरूपा विखाळे, संदेश राबांडे, प्रवीण वरूणकर, अरविंद राणे, सुजीत जाधव, प्रदीप सावंत, रूपेश जाधव, मधुकर वळजू यांची निवड करण्यात आली आहे. 

मालवण तालुका समिती 
मालवण नगर परिषद नगरसेवक मंदार मोहन केणी यांची समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून सुनील पाताडे, अनुष्का गांवकर, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, उदय दुखंडे, संजय साळकर, भाऊ चव्हाण, गणेश कुडाळकर, कृष्णा चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. 

सावंतवाडी तालुका समिती 
सावंतवाडी तालुका समिती अध्यक्षपदी अशोक राजाराम दळवी यांची निवड करण्यात आली आहे. अनिल जाधव, भारती मोरे, उदय पारीपत्ये, शैलेश गवंडळकर, दिगंबर परब, संजय देसाई, नारायण राणे, अनिल नातू, गजानन नाटेकर यांची सदस्य म्हणून जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी निवड केली आहे. 

वेंगुर्ले तालुका समिती 
वेंगुर्ले तालुका समिती अध्यक्षपदी माजी तालुका सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य यशवंत सुभाष परब यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून विश्वनाथ चव्हाण, सुकन्या नरसुले, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविंद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. 

वैभववाडी तालुका समिती 
वैभववाडी तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून मंगेश तुकाराम लोके यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून रविंद्र पवार, सारिका सुतार, सुरेश पांचाळ, स्वप्निल धुरी, श्रीकृष्ण साईल, राजेश तावडे, संकेत सावंत, भालचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. 

कुडाळ तालुका समिती 
आत्माराम नारायण बंगे यांची कुडाळ तालुकास्तरीय समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. भास्कर परब, श्रेया परब, भीकाजी कोरगांवकर, प्रवीण भोगटे, यशपाल सावंत, दिलीप सर्वेकर, महादेव पालव, रमाकांत ताम्हाणेकर, संजय पालव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

दोडामार्ग तालुका समिती 
दोडामार्ग तालुका अध्यक्ष म्हणून गणेशप्रसाद शंकर गवस यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून लक्ष्मण आयनोडकर, श्रेयाली गवस, घनशाम कर्पे, गणपत देसाई, साबाजी सावंत, संतोष मोर्ये, आत्माराम नाईक यांची निवड करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Gandhi Niradhar Scheme New Committee Form