मल्टिप्लेक्‍सच्या जमान्यात पत्र्याचे थिएटर कशाला..... ? 

Sanvantwadi Municipal Monthly Meetings Turbulence In Sindudurg Kokan Marathi News
Sanvantwadi Municipal Monthly Meetings Turbulence In Sindudurg Kokan Marathi News

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : शहरात कंटेनर थिएटर उभारण्यासाठी भाडेतत्वावर जागा देण्यावरून आज पालिकेच्या मासिक बैठकीत गोंधळ झाला. मल्टिप्लेक्‍सच्या जमान्यात पत्र्याचे तात्पुरते थिएटर कशाला, यासाठी पालिकेने स्वतःचे थिएटर उभारण्यासाठी प्रयत्न करावे. याची तरतूद नव्याने होणाऱ्या व्यापारी संकुलनातून करावी, अशी मागणी नगरसेवक जयेंद्र परुळेकर लावून धरली. यामुळे श्री. परूळेकर व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये काहीही तू-तू, मै-मै झाली.
 
यावेळी शहरात नागरिकांच्या करमणुकीचा विचार करता या कामाला तात्काळ जागा उपलब्ध करून द्या. भविष्यात पालिकेचे थिएटर उभे राहिल्यास कंटेनर थिएटरबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे ऍड. परीमल नाईक यांनी सांगत डॉ. परुळेकर यांची मागणी उडवून लावली. पालिकेमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शहर विकासासाठी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

 कोणताही वायफळ खर्च नाही
यावेळी विरोधी गटाकडून डॉ. जयेंद्र परुळेकर व गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी काही विषय मांडले. यामध्ये नगराध्यक्षाची केबिन वातानुकुलित करताना कुठल्याही प्रकारचा ठराव अथवा चर्चा नव्हती; पण खर्च करण्यात आला, या संदर्भात डॉ. परळीकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना नगराध्यक्षनी शहर विकासाच्या दृष्टीने काही निधी खर्च करताना हक्क असतो. त्यामुळे हे काम हाती घेण्यात आले आहे; परंतु कोणताही वायफळ खर्च न करता मर्यादित खर्चात हे काम करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. 

लोबो म्हणाल्या जे काम कराल ते पद्‌धतशीरपणे करा....


येणाऱ्या काळात एमआरपीचे काम आहे. ते हाती घेण्यात येणार असून केबिन हा एक प्रयोग आहे, असे सांगितले. यावर गटनेत्या लोबो यांनी या गोष्टीला आमचा विरोध नाही; मात्र जे काम कराल ते पद्‌धतशीरपणे करा, असे सूचित केले. यावेळी अग्निशामक केंद्र व नगरपरिषद कार्यालय इमारतीचे विस्तारीकरण करण्याच्या आराखड्याबाबत चर्चा झाली. यामध्ये अग्निशमन केंद्र उभारताना या आराखड्यामध्ये पालिकेचे सुसज्ज सभागृह असावे, अशी मागणी लोबो यांनी केली.
 मुख्याधिकारी यांच्या निवास्थान बांधण्याबाबत परुळेकर यांनी मुद्दा उपस्थित करून भाडेतत्त्वावर निवासस्थानाची सोय करावी, अशी मागणी केली. याला राजू बेग यांनी आक्षेप घेत निवासस्थान उभारल्यास ती कायमस्वरूपी पालिकेचे प्रॉपर्टी राहील, असे सांगून या विषयाला बगल दिला.

डिपॉझिट न देतात भाडेवाढ करा...

नगरपालिकेच्या व्यापारी संकुलनतील गाळे धारकांकडून पुन्हा डिपॉझिट घेताना भाडेवाढ केल्यास त्यांच्यावर अन्याय होईल, त्यामुळे डिपॉझिट न देतात भाडेवाढ करा, असे लोबो यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागांमध्ये काम करताना त्याची कल्पना संबंधित नगरसेवकाला देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केली. शिवाय स्विमिंग पूलचे काम लवकरच पूर्ण करून ते सुरू करावे यामध्ये महिलांसाठीही योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केली. 
 
महोत्सवाची प्रसिध्दी करा 
पालिकेच्या पर्यटन महोत्सवावर श्री. परुळेकर यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेताना हा महोत्सव पर्यटन महोत्सव म्हणून नको तर सावंतवाडी महोत्सव म्हणून घ्या, असे सूचित केले. हायवे व रेल्वे यापासून हे शहर दूर गेल्यामुळे येथील पर्यटन गेल्या बारा वर्षांमध्ये वाढले नाही. त्यामुळे पर्यटन महोत्सव घेताना त्याची प्रसिध्दी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये करून जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली. यासंदर्भात नक्कीच विचारविनिमय करून तोडगा काढू, असे आश्‍वासन नगराध्यक्ष परब यांनी दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com