Raigad Fort : पालीच्या ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर मानवनिर्मित वणव्याचा कहर; नव्याने लावलेली झाडे जळाली, माकडे आणि पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

Forest Fires Damage Historic Sarasgad Fort and Wildlife : पाली येथील ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वृक्षसंपदा, नव्याने लावलेली रोपे आणि पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे. मागील आठवड्यातील आगीमुळे किल्ल्याचा बहुतांश भाग होरपळला.
Forest Fires Damage Historic Sarasgad Fort and Wildlife

Forest Fires Damage Historic Sarasgad Fort and Wildlife

esakal

Updated on: 

पाली : प्राचीन व ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे किल्ल्याची होरपळ होत आहे. तसेच येथील वनसंपदा व पशुपक्षांची वाताहत होत आहे. मागील आठवड्यात सरसगडावर मानवनिर्मित वणवा लागून किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला आहे. वणव्यामुळे किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.स्थानिक नागरिक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र धोकादायक ठिकाणी जाताना आल्यामुळे काही पर्याय उरत नाही. वनव्यामुळे जळून काळाकुट्ट झालेला किल्ला पाहताना अनेकांना दुःख होते. 

Loading content, please wait...