वेंगुर्लेत सरपंचपदांसाठी 28 ला आरक्षण सोडत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

तालुक्‍यात एकूण 30 ग्रामपंचायती आहे. 2020 ते 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन हे सरपंचपदाचे आरक्षण होणार आहे.

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत 28 ला सकाळी 11 वाजता येथील तहसिलदार कार्यालयात काढण्यात येणार आहे. 

तालुक्‍यात एकूण 30 ग्रामपंचायती आहे. 2020 ते 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन हे सरपंचपदाचे आरक्षण होणार आहे. वेंगुर्लेची लोकसंख्या 73 हजार 409 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3117 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 337 एवढी आहे.

त्यामुळे अनुसूचित जातीसाठी प्रवर्ग एक व प्रवर्ग महिला एक अशी दोन सरपंचपदे आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जमातीची लोकसंख्या येथे नगण्य आहे. त्यामुळे येथे त्यासाठी सरपंच पदासाठी आरक्षण नाही. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 प्रवर्ग व 4 महिला अशी आठ सरपंच पदे व खुल्या वर्गासाठी 10 सर्वसाधारण अशी 20 पदे आरक्षित होणार आहे.

या सरपंचपदाची आरक्षण सोडत 28 ला सकाळी 11 वाजता तहसिलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे. तरी तालुक्‍यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी प्रवर्ग निहाय सरपंचपद आरक्षण निश्‍चितीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार प्रविण लोकरे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch reservation in Vengurle Declaration on 28 Januvary