पाली - स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले, मात्र निवडून आलेल्या महिलांच्या जागी त्यांचे पतीदेवच कारभार हाताळतांना दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ग्रुपग्रामपंचायत मध्ये असाच प्रत्यय आला आहे..सरपंचांचे पती कारभारात हस्तक्षेप करत असून सरपंच व उपसरपंचांच्या खुर्चीवर बसण्यापासून निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. तसेच आर्थिक लाभ ही घेत आहेत. अशी लेखी तक्रार कोकण विभागीय आयुक्त यांना येथील ग्रामस्थांनी व एका ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. तसेच संबंधित व्हिडीओ व छायाचित्र देखील काढले आहेत..ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की ५/११/२०२३ रोजी पाच्छापूर ग्रुपग्रामपंचायतची निवडणुक पार पाडून दिनांक ६/११/२०२३ रोजी सुधारित बदलानुसार सरपंचाची थेट नेमणूक होवून उत्कर्षा रोशन बेलोसे या सरपंच झाल्या.त्यानंतर सरपंच उत्कर्षा यांचे पती रोशन बेलोसे ग्रामपंचायतीमध्ये वारंवार ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजात भाग घेणे, हस्तक्षेप करणे तसेच ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात नसताना सरपंचाच्या खुर्चीवर बसणे तसेच उपसरपंचांच्या खुर्चीवर बसणे, वारंवार सरपंच यांच्या च्या दालनामध्ये बसणे व ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात नसताना ग्रामपंचायतीचे दफ्तर हातात घेणे व त्याचे फोटो काढणे तसेच झेरॉक्स काढून व घेऊन जाणे यासारखे प्रकार करीत आहे..उत्कर्षा रोशन बेलोसे या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर ज्या ज्या वेळी सदस्यांची मासिक मीटिंग भरवली जाते त्या त्या वेळी सरपंच यांचे पती रोशन बेलोसे हे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसतात व मासिक सभा संपताच सर्व सदस्यांसह सरपंचांच्या दालनात बसतात. शिवाय मासिक सभेत जे जे ठराव घेतले जातात त्यामध्ये वारंवार हस्तक्षेप करतात.त्यामुळे सरपंच यांचे पती रोशन बेलोसे यांची ग्रामपंचायतीचे कामकाजातील हस्तक्षेपाबाबत चौकशी करण्यात यावी. तसेच शासन निर्णय परिपत्रक झेडपीए १००५/९४ मु.स/प्र.क्र.१०४ प रा १. १७ जुलै २००७ नुसार कलम ३९ (१) नुसार सरपंचावर गैरवर्तणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे..आर्थिक लाभअर्जात म्हंटले आहे की, सरपंचांचे पती रोशन बेलोसे हे ग्रामपंचायत अंतर्गत स्वत: अनेक निकृष्ठ दर्जाची कामे करून त्यांची बिले काढून ग्रामपंचायतीकडून व्यक्तीश: आर्थिक लाभ घेत आहेत. व त्यास सरपंच यांचा पाठिंबा असून अशा प्रकारे सरपंच हे ग्रामपंचायतींच्या कामातून पतीद्वारे आर्थिक लाभ मिळवत असल्याने शासनाची फसवणूक करीत आहेत..वास्तविक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये कार्यप्रणाली दिली असून त्याअन्वये सरपंच हे कार्य करत नसून ग्रामपंचायत अधिनियमांच्या तरतुदींचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.सदर तक्रारीच्या अनुषंगाने पाछापुर ग्रामपंचायत प्रकरणात विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल तयार केला जाणार आहे. व पुढील कार्यवाहीसाठी अलिबाग वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाणार आहे.- लता मोहिते, गटविकास अधिकारी, पाली-सुधागड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.