Satavali Fort from the era of Chhatrapati Shivaji Maharaj to receive state protected monument status
esakal
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेली ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ‘साटवली गढी’ (साटवलीचा किल्ला) आता राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्याची शक्यता (Satavali Fort Maharashtra Archaeology Department) आहे. या गढीला राज्य संरक्षित दर्जा देण्यासाठी राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभागाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, संचालक स्तरावरून आवश्यक ती शासकीय कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. या संदर्भातील प्रस्ताव सध्या अंतिम प्रक्रियेत असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली.