Aachara Agitation : तळाशील वाचवा, कोकण वाचवा! खाडीत उतरून महिलांचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली

तळाशील येथील अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनाने आता रौद्ररूप धारण केले आहे.
Aachara Agitation Women Launch Intense Protest

Aachara Agitation Women Launch Intense Protest

sakal

Updated on

आचरा - तळाशील येथील अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनाने आता रौद्ररूप धारण केले आहे. प्रशासनाला दिलेली दोन दिवसांची मुदत संपूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, संतप्त महिलांनी आज सायंकाळपासून थेट खाडीच्या पाण्यात उतरून 'जलआंदोलन' सुरू केले. या आंदोलनादरम्यान पाण्यात उभे राहिल्याने दोन महिलांची प्रकृती खालावली असून, एका महिलेला पुढील उपचारासाठी मालवण येथे हलवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com