Pali Annachhatra
sakal
पाली - कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे व दरवाढीमुळे पालीतील ऐतिहासिक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रावर संक्रांत आली आहे. सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने आता पारंपरिक 'चुलीवर' स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या दररोज २०० भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे.