Sawantwadi Car Accident : खिडकीतून बाहेर फेकले गेल्यानंतर कार अंगावर कोसळून 4 वर्षांचा बालक ठार; खामदेव नाक्याजवळ अपघात; 25 फूट खोल गटार

Sawantwadi Car Accident at Banda Khamdev Naka : सावंतवाडीतील बांदा खामदेव नाका येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. अपघातात खिडकीतून बाहेर फेकल्या गेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
Sawantwadi Car Accident at Banda Khamdev Naka

Sawantwadi Car Accident at Banda Khamdev Naka

esakal

Updated on

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-खामदेव नाका येथे भरधाव वेगातील मोटार सुमारे २५ फूट खोल गटारात कोसळल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शौर्य सचिन तुयेकर (वय ४, रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. पुलाच्या कामामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघात मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com