सावंतवाडी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत

सावंतवाडी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत धोकादायक

सावंतवाडी: शहरातील समाजमंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत जीर्ण झाले आहे. येत्या पावसाळ्यात ते कोसळून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका उद्‌भवू शकतो. दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध असतानाही त्याकडे पालिका प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. या चाळीची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे.

वाडकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे, की समाजमंदिरामागे असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छप्पर जीर्ण झाले आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी छपराला लाकडी टेकूचा आधार देऊन गतवर्षी पावसाळा कसाबसा काढला.

मात्र, अलीकडेच झालेल्या पावसाळ्यात हा टेकू सरकल्याने छप्पर धोकादायक बनले आहे. यावर्षीच्य़ा पावसाळ्यात ते कोसळण्याची भीतीही व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची वारंवार मागणी केली जात आहे; मात्र याकडे पालिका प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात आली. अद्याप या इमारतीच्या डागडुजीबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे समोर येत आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे; मात्र वापरला जात नाही. त्यामुळे चाळीत राहणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवितास व इमारतीस धोका आहे. याप्रकरणी जातीनिशी लक्ष देऊन चाळीची इमारत दुरुस्त करावी, असे म्हटले आहे.

Web Title: Sawantwadi Dangerous Municipal Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top