₹316 Crore to Be Spent on 30-Km Road Project
esakal
सावंतवाडी : तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सावंतवाडी-शिरोडा मार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली (Sawantwadi Shiroda Road) असून, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. सुमारे ३० किलोमीटरच्या या मार्गासाठी तब्बल ३१६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, जानेवारीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. रुंदीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे.