
यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीपासून झाडांना कणी दिसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरंगीचे कळे, फुले वेचण्यास सुरुवात झाली आहे.
वैभववाडीः जिल्ह्यात सुरंगीच्या हंगामाला प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांनी सुरंगीचे कळे, फुले वेचण्याची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. कोट्यवधींची उलाढाल आणि सिंधुदुर्गाची (Sindhudurg) मक्तेदारी असलेल्या या पिकात यावर्षी पालवीमुळे उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. सुरंगीला प्रतिकिलो ४५० ते ५०० रुपये दर मिळत आहे. पुढील आठवड्यात हंगामाला गती प्राप्त होण्याचा अंदाज आहे.