सिंधुदुर्गात आजपासून शाळा पूर्ण क्षमतेने

सीईओंचे आदेश; सकाळी ७ ते दुपारी १२.३० पर्यत वर्ग
Schools in Sindhudurg at full capacity from today revised guidelines
Schools in Sindhudurg at full capacity from today revised guidelinesSakal

सिंधुदुर्गनगरी/कणकवली : जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा ३१ मार्चपासून सकाळच्या सत्रात ७ ते १२.३० या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी नायर यांनी सकाळच्या सत्रात ७ ते दुपारी १२.३० या वेळेत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार ३१ मार्चपासून सकाळी ७ ते दुपारी १२.३० पर्यंत सर्व शाळा सुरू राहतील. सोमवार ते शनिवार या दिवशी वेळापत्रकानुसार मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सकाळी ७ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मेमध्ये जाहीर करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशात शाळेच्या तासिकांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सकाळी चार तासिका व मधल्या सुटीनंतर पाच तासिका अशा एकूण नऊ तासिका ३० मिनिटांच्या घेतल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचे बेत बदलावे लागणार

यापूर्वी एप्रिलच्या पहिल्‍या आठवड्यात परीक्षा घेतल्‍या जात होत्या. त्‍यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच विद्यार्थी सुट्टीवर जात असत. यात अनेक पालक मुंबई किंवा अन्य ठिकाणीही मुलांना घेऊन जात; मात्र आता वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत. तर निकाल मे महिन्याच्या पहिल्‍या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना एप्रिल मे महिन्यातील सुट्यांचे बेत बदलावे लागणार आहेत.

आदेशातील ठळक बाबी

- आता सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत असेल शाळेची वेळ

- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 100 टक्‍के उपस्थिती बंधनकारक

- शनिवारीही साडे बारापर्यंत भरणार शाळा. तर मधली सुट्टी अर्ध्यातासाची

- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात

- रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा भरविण्यास मान्यता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com