esakal | कोरोनाविरोधी सेलच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी दिला 'हा' सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाविरोधी सेलच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी दिला 'हा' सल्ला

कोरोनाविरोधी सेलच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी दिला 'हा' सल्ला

sakal_logo
By
गोविंद राठोड

खेड : सामान्य माणसाला कोरोना (covid-19) विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी नैसर्गिकपणे वाफ घेतली तर आपल्या शरीरात घशातील पेशींमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या किलर सेलची निर्मिती होते. म्हणून ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी आणि ज्यांना कोरोना झालेला आहे, त्यांनीदेखील रोज सकाळी आणि संध्याकाळी पाच मिनिटे (steam) वाफ घ्यावी, असा मौलिक सल्ला शास्त्रज्ञ डॉ. दिलीप पवार (Dr. dilip pawar) यांनी दिला आहे.

नुकतेच खेडमध्ये भैरवनाथ कोविड सेंटरच्या उद्‌घाटनासाठी डॉ. पवार आले होते, त्या वेळी त्यांनी ही माहिती 'सकाळ’ला दिली. पवार म्हणाले, पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाफ घेऊ नये. फक्त पाच मनिटेच वाफ घेतली तर त्याचा अधिक फायदा होतो. कोविड-१९ चा विषाणू ५० ते ६० अंश डिग्री सेल्सिअस तापमानात मरण पावतो, म्हणून सुमारे पाच मिनिटे उकळत्या पाण्याची वाफ घेतली तर त्याचा प्रभाव त्या विषाणूवर पडतो. या वाफेमुळे आपल्या घशातील पेशींमध्ये विषाणू किंवा कोणत्याही जंतूंबरोबर लढण्याची क्षमता असणाऱ्या (किलर सेल) मारक्या पेशींची निर्मिती होते व या पेशी कोरोना विषाणूंबरोबर लढा देण्यास तयार होता. तसेच वाफ घेतल्याने हिट्स प्रोटिनचीही (proteins) निर्मिती होत असते. त्यामुळे घशातील जंतू कमजोर केले जातात. पेशींची प्रतिकारशक्ती वाढते. गरम पाण्याच्या वाफेमुळे रेस्पिरेटरी अल्कोलोसेस (श्वसनक्षारिय रोग) तयार होतात. त्यामुळे एकापेक्षा विषाणूंची निर्मिती (मल्टिफिकेशन) संक्रमण होणे थांबते. अशावेळी संपर्कातील व्यक्तींना कमी धोका उद्‌भवतो.

हेही वाचा: पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये संशोधन

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात सेव्हन हिल्स हॅास्पिटलमध्ये संशोधन केल्यानंतर हा प्रयोग अनेक रुग्णांवर केला तसेच कांदिवलीतील कोरोना क्वारंटाईन सेंटरमधील ४०० रुग्णांवर उपचार केले. ते सर्व रुग्ण बरे झाले, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

कर्करोगावर आधुनिक संशोधन

डॉ. पवार हे मुंबईच्या संचेती हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार करतात व कर्करोगावर आधुनिक प्रकारचे संशोधन करत आहेत. मुंबईमध्ये अनेक कोविड सेंटरमध्ये त्यांना बोलावले जाते व त्यांचा सल्ला घेतला जातो. डॉ. पवार यांनी आतापर्यंत कोविड रुग्णांसाठी खूप मोठे काम केले आहे. अमेरिका, दुबई, स्पेन, सिंगापूर, इटली, कॅनडा, जॅार्डन, थायलंड, बॅंकॅाक आदी देशांना त्यांनी कर्करोगावरील विविध संमेलनासाठी भेटी दिल्या असून भारतातही मोठमोठ्या शहरांत त्यांनी अनेक महाविद्यालयांना मार्गदर्शन केले आहे.

हेही वाचा: रत्नागिरीत का वाढतो कोरोना? ही आहेत कारणे

जगभरात संशोधन मान्य

कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर देशभरात या विषाणूंशी कसा लढा द्यायचा, असा प्रश्न सर्व भारतीय डॉक्टरांसमोर होता. त्या वेळेला विशेष संशोधन करून डॉ. पवार यांनीच वाफ घेतल्याने कोरोना विषाणू मरतो, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवल्याने जगभरात त्यांचे हे संशोधन मान्य करण्यात आले. तेव्हापासून सर्वत्र वाफ घेण्याचा मौलिक सल्ला देण्यात येऊ लागला.

loading image