

Siddhi Bhide NEET Konkan Topper Death Shocks Banda Area
Esakal
बांदा, ता. २३ ः अगदी सातवीत असल्यापासून कर्करोगाशी झुंज देत डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शहरातील रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. डॉक्टर बनून इतरांना रोगमुक्त करण्याचे तिचे स्वप्न यामुळे अवघ्या २० व्या वर्षी भंगले. तिच्या या एक्झिटमुळे संपूर्ण बांदा परिसरावर शोककळा पसरली आहे.