
कणकवली (सिंधुदुर्ग) - देशभरामध्ये कोरोनो रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कडक तपासणी सुरू केली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर जेथे गाड्या थांबत आहेत. अशा स्थानकांवर आरोग्य पथके आणि रेल्वेकडून प्रवाशांचे स्क्रीनिंग व आरोग्य चाचणी सुरू झाली आहे.
नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोराना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परराज्यातून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच मुंबईकडे जाणारे प्रवासी आणि मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांची ही तपासणी होत आहे. कोकणातील बहुतांशी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची स्क्रिनींग आणि चाचणी करण्यात येत आहे.
यासाठी विविध स्थानकांवर स्थानिक प्रशासनाने आरोग्य पथके तैनात केली आहेत. या आरोग्य पथकांजवळ सॅनिटायझर, माक्स दिले असून थर्मलगनच्या साह्याने तापमान मोजले जात आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी आरक्षण असलेल्या प्रवाशांना एक तास अगोदर यावे लागत आहे. अशा प्रवाशांची तिकीट तपासले जात असून प्रवासांकडील ओळखपत्रही तपासले जात आहे. त्यांचे तापमानही निश्चित केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या विविध नगरांमधील कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून कोकणात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राज्यशासनाने परराज्यातून वाहानातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी सीमेवर सुरू केली आहे; मात्र रेल्वे येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही रेल्वे स्थानकातच केली जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतर होऊ लागले आहेत. दिल्लीत मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
ज्या रुग्णांना ताप असेल किंवा आजारी असतील अशांना स्थानकावर उतरल्यानंतर तत्काळ उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील आरोग्य केंद्रांना सूचना देण्यात आली असून तशी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळेच रेल्वे ज्या ज्या स्थानकांवर थांबवली जाते. त्याच स्थानकांवर आरोग्य पथके दिवसभर तैनात करण्यात आली आहेत.
एक रेल्वे प्रवासी बाधित
जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एका गावातील एकजण कोरोना बाधित आढळला होता. या रूग्णाने 19 मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने प्रवास केला होता. या रेल्वेत एस 3 डब्यात बाधित रुग्ण होता. मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवलेही होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
शासनाचे नियम
* प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
* निगेटिव्ह व्यक्तीला प्रवासाची मुभा
* माक्स आणि ओळखपत्र बंधणकारक
* गाडी प्रस्थांनाच्या एकातास अगोदर तपासणी
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.