ओसरगाव टोलनाक्‍यावर नऊ लाखांची दारू जप्त 

Seized liquor nine lakh osargao konkan sindhudurg
Seized liquor nine lakh osargao konkan sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) - गोवा ते मुंबई जाणाऱ्या टेम्पोतील सुमारे नऊ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू कणकवली पोलिसांनी जप्त केली. पहाटे अडीचच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना अंधाराचा फायदा घेऊन टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी तेथून पसार झाले. 

गोव्याहून मुंबईच्या दिशेने टेम्पोमधून दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ओसरगाव टोलनाका येथे रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात असलेला टेम्पो (जीजे 06 एक्‍स 7898) पोलिसांनी थांबवला. यावेळी चालकाने टेम्पोमध्ये पुठ्ठा साहित्य असल्याचे सांगितले. पोलिसांनी पाठीमागील ताडपत्री उघडण्यास सांगितल्यानंतर चालक आणि त्याचा सहकारी खाली उतरले आणि तेथून पसार झाले. यानंतर पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता हौद्यात पुठ्ठ्यांच्या मधोमध दारूच्या बाटल्यांचे बॉक्‍स आढळून आले. त्यांची एकत्रित किंमत सुमारे नऊ लाख रुपये आहे. 

कणकवली पोलिसांनी दारू वाहतुकीचा टेम्पो पोलिस ठाण्यात आणला असून टेम्पोचालक आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये सहायक निरीक्षक बापू खरात, शिवाजी सावंत, राजेश उबाळे, कॉन्स्टेबल रूपेश गुरव, नितीन बनसोडे, होमगार्ड पवार आदी सहभागी झाले होते. फिर्याद कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com