esakal | सिंधुदुर्गात बचतगट बांधणीलाही कोरोनामुळे ब्रेक 
sakal

बोलून बातमी शोधा

self help group issue in sindhudurg district

कोरोनामुळे नवीन बचतगट बांधणीला ब्रेक लागला होता. त्यामुळे उर्वरित साडेचार महिन्यात 235 बचतगट उभारणीचे आवाहन अभियानच्या जिल्हा व्यवस्थापन कक्षासमोर राहिले आहे. 

सिंधुदुर्गात बचतगट बांधणीलाही कोरोनामुळे ब्रेक 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे बचतगट बांधणीलाही ब्रेक लागला आहे. सिंधुदुर्गात यावर्षी आतापर्यंत अवघे 32.86 टक्केच काम झाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नवीन बचटगट बांधणीसाठी 350 एवढे उद्दिष्ट दिले आहे. यातील ऑक्‍टोबर 2020 अखेर 115 नवीन बचटगट बांधणी पूर्ण झाली आहे. एकूण 32.86 टक्के काम झाले आहे. कोरोनामुळे नवीन बचतगट बांधणीला ब्रेक लागला होता. त्यामुळे उर्वरित साडेचार महिन्यात 235 बचतगट उभारणीचे आवाहन अभियानच्या जिल्हा व्यवस्थापन कक्षासमोर राहिले आहे. 

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये नवीन बचतगट उभारणीसाठी 350 एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या सात महिन्यात यातील 115 एवढे साध्य झाले आहे. 350 पैकी जिल्ह्यातील देवगड 10, कुडाळ 50, सावंतवाडी 50, वेंगुर्ले 15, दोडामार्ग 10, कणकवली 100, मालवण 105 आणि वैभववाडी 10 असे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील देवगड 4, कुडाळ 16, सावंतवाडी 32, वेंगुर्ले 16, दोडामार्ग 7, कणकवली 19, मालवण 12, वैभववाडी 6 अशाप्रकारे उद्दिष्ट साध्य झाले आहे. यातील वेंगुर्ले तालुक्‍यात 106.67 टक्के काम झाले आहे. 

आर्थिक वर्षासाठी जुन्या गटांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले नाही. तरीही 49 जुन्या बचतगटांची पुन्हा बांधणी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्यावतीने केली आहे. यात सर्वाधिक मालवण 18 आणि कणकवली तालुक्‍यात 13 एवढे काम झाले आहे. अभियान अंतर्गत बचतगटांना प्रशिक्षण देणे व क्षमता बांधणी करणे यासाठीही 350 बचतगटांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील 164 बचतगटांना प्रशिक्षण व क्षमता बांधणी करण्यात यश आलेले आहे. उद्दीष्टाच्या 46.86 टक्के काम झाले आहे. यात देवगड 10 पैकी 7, कुडाळ 50 पैकी 18, सावंतवाडी 50 पैकी 38, वेंगुर्ले 15 पैकी 19, दोडामार्ग 10 पैकी 11, कणकवली 100 पैकी 32, मालवण 105 पैकी 30, वैभववाडी 10 पैकी 9 असे काम झाले आहे. यात वेंगुर्ले 126.67 टक्के तर दोडामार्ग 110 टक्के असे सर्वाधिक काम झाले आहे. हिशेबणीस प्रशिक्षणाची 350 एवढे उद्दिष्ट आहे. यामध्येही वरीलप्रमाणे 46.86 टक्केच काम झाले आहे. 

बॅंक अधिकारी प्रशिक्षणासाठी 450 बचतगटांचे उद्दिष्ट असताना अद्याप एकाही बचतगटाला हे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. यामध्ये जिल्हा अभियान कक्षाला यश आलेले नाही. ग्रामसंघ बांधणीचे 10 एवढे उद्दिष्ट आहे. त्यातील दोन ग्रामसंघ झालेली आहे. 20 टक्के काम झालेले आहे. प्रभागसंघ बांधणीसाठी मात्र उद्दिष्ट देण्यात आलेले नाही. फिरता निधी वाटपसाठी 13 कोटी रूपयांचे उद्दिष्ट आहे. यातील एक कोटी 8 लाख रुपये फिरता निधी वाटप झाले आहे. 8.31 टक्के काम झाले आहे. आर्थिक प्रगतीसाठी एक कोटी 96 लाख 34 हजार रुपये एवढे उद्दिष्ट आहे. 16 लाख 20 हजार रूपयांचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. 8.25 टक्के काम झाले आहे. समुदाय गुंतवणूक निधी वाटपमध्ये भौतिक प्रगतीसाठी 6 कोटी 59 लाख एवढे उद्दिष्ट आहे. यातील एकाही रूपयांचा निधी वाटप झालेले नाही. तीच स्थिती आर्थिक प्रगतीबाबत आहे. 3 कोटी 95 लाख 65 हजार रुपये उद्दिष्ट असताना येथेही एकाही रूपयाचे वाटप झालेले नाही. 

अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज पुरवठा करणे अंतर्गत भौतिक प्रगतीसाठी 28 कोटी 10 लाख तर आर्थिक प्रगतीसाठी 35 कोटी 69 लाख 86 हजार रूपयांचे उद्दिष्ट होते. यातील भौतिक प्रगतीमधील 12 कोटी 99 लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे. 46.23 टक्के काम झाले आहे. आर्थिक प्रगतीसाठी 35 कोटी 69 लाख 86 हजार रुपये उद्दिष्ट आहे. पैकी 15 कोटी 35 लाख 22 हजार रुपये म्हणजेच 43.1 टक्के साध्य झाले आहे. 
- वैभव पवार, उमेद व्यवस्थापक 

तालुकानिहाय आकडेवारी अशी 
तालुका उद्दिष्ट (रक्कम) साध्य (रक्कम) 
- देवगड 3 कोटी 1 कोटी 46 लाख 
- कुडाळ 4 कोटी 50 लाख 1 कोटी 53 लाख 
- सावंतवाडी 4 कोटी 30 लाख 2 कोटी 5 लाख 
- वेंगुर्ले 2 कोटी 50 लाख 1 कोटी 3 लाख 
- दोडामार्ग 2 कोटी 20 लाख 1 कोटी 68 लाख 
- कणकवली 4 कोटी 80 लाख 2 कोटी 34 लाख 
- मालवण 4 कोटी 80 लाख 1 कोटी 48 लाख 
- वैभववाडी 2 कोटी 1 कोटी 42 लाख 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top