esakal | गणेशोत्सवात सात गीते भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

गणेशोत्सवात सात गीते भेटीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: रत्नागिरीतील आकाशवाणीचे ए ग्रेड मान्यताप्राप्त संगीतकार अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली गणपती गीते गणेशोत्सवानिमित्ताने "शिवतनया विघ्नेशा" शीर्षकांतर्गत रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. १० सप्टेंबरला सकाळी ७ वाजता गणेश चतुर्थीला ७ गीते "कला वैभव अवधूत बाम" यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहेत.

शिवतनया, गणेश पाळणा गीत, बाप्पा आला, कमानी सजवा, रत्ननगरीच्या राजा, गणपती बाप्पा सांगा, पारंपरिक आरती अशी एकूण ७ गीते आहेत.

ही गीते गायक स्वप्नील गोरे, दिव्या आपटे, ज्ञानेश्वरी चिंदरकर, करुणा रानडे-पटवर्धन, अभिजित भट, अभिषेक भालेकर यांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. याचे संगीत संयोजन निशांत लिंगायत व गणेश घाणेकर यांनी केले असून तबलासाथ अभिषेक भालेकर, पखवाजसाथ प्रथमेश तारळकर यांची आहे. लेखन व निवेदन अनुया बाम यांचे असून गीतांसाठी शास्त्रीय गायक प्रसाद गुळवणी यांचे संगीत मार्गदर्शन लाभले आहे. यासाठी प्रसन्न दाते यांचे विशेष तांत्रिक साहाय्य लाभले आहे. रसिकांनी गणेशोत्सवात या गीतांचा आस्वाद घेण्याचे आवाहन संगीतकार अवधूत बाम यांनी केले आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकार

ही गीते प. पू. टेंब्ये स्वामी, धरणीधर महाराज, तसेच अभिजित नांदगावकर, नितीन देशमुख, पुरुषोत्तम डोंगरे, सुनील काजारे यांनी लिहिलेली आहेत. या गणपती गीतांचे बहुतांश गीतकार, गायक कलाकार हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील आहेत.

loading image
go to top