शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल ; नारायण राणेंच्या बंगल्यावर झाला पक्षप्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिगग्ज नेते म्हणून गुलाबराव चव्हाण यांना ओळखले जाते.

मालवण - आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, शरद पवार यांचे खंदे समर्थक, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिगग्ज नेते म्हणून गुलाबराव चव्हाण यांना ओळखले जाते. आज त्यांनी राणेंच्या येथील नीलरत्न निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत, दिलीप रावराणे, संजय चव्हाण, राजू राऊळ, सुदेश आचरेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, बाबा परब यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

वाचा - ठाकरे सरकार 'या' महिन्यापर्यंत कोसळणार 

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्यापासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे श्री. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, शरद पवार यांचे खंदे समर्थक, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's supporter joins BJP in kokan