शार्क माशांच्या ज्या प्रजाती आहेत म्हणजे पाकट आणि मुशी ही मासळी किनाऱ्यालगत सापडत नाहीत. ही मासळी जास्तीत जास्त खडकाळ भागात प्रजननासाठी येते.
दापोली : भारतातील ५१ समुद्री मत्स्यप्रजाती लोप पावत असतानाच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी) आणि गिटारफीश, पाकट प्रजाती मिळण्याचे ठिकाण म्हणून नामांकित केले आहे.