मोहोपाडाच्या उपसरपंचपदी शिंदे बिनविरोध

लक्ष्मण डूबे 
मंगळवार, 3 जुलै 2018

रसायनी (रायगड) : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आघाडीचे दत्तात्रेय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंच पदाची निवडणुक आज मंगळवारी (ता.03) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी आघाडीचे दत्तात्रेय शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे यांच्या विरोधात इतर उमेदवारी अर्ज दाखल नसल्यामुळे सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी दत्तात्रेय शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली. 

यावेळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आवारात जमलेल्या आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटक्याच्या आताषबाजीत व गुलाल उधळुन आनंद साजरा केला. तर दत्तात्रेय शिंदे यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेउमेदवारी दिली होती.

रायगड जिल्ह्यात लोकसंख्याने मोठी आणि प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे यांची आघाडी आणि शिवसेना, भाजपा, आरपीआय यांच्यात लढत झाली. सत्तरा जागांपैकी आघाडीला अकरा जागा मिळाल्या तर आघाडीच्याच अनुसूचित जमाती महिला ताई पुंडलिक पवार थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. युतीला सहा जागा मिळाल्या. युतीच्या पराभवामुळे शिवसेनाचे ग्रामपंचायती वरील वर्चस्व संतुष्टात आले. 

दरम्यान सरपंच ताई पवार उपसरपंच दत्तात्रेय शिंदे यांचे महिला व बाल कल्याण सभापति उमाताई मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिती सभापति कांचन पारंगे, सदस्या वृषाली पाटील, माजी सरपंच संदीप मुंढे व कृष्णा पारंगे, ग्रामविकास आधिकारी मोहन दिवकर आणि इतरांनी अभिनंदन केले. 

Web Title: Shinde unopposed for the post vice sarpanch in Mohopadha's