Unseasonal Rain : शिराळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळामुळे मोठे नुकसान

Trees Fall on Houses : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शिराळा परिसरात दाणादाण उडाली आहे. झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
Heavy Damag

Heavy Damag

sakal

Updated on

वैभववाडी : जिल्ह्याच्या बहुतांश भागाला आज सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसला. शिराळेत वादळाने दाणादाण उडाली. यात काही घरांची पडझड झाली आहे. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान अटळ आहे. जिल्ह्याला गुरुवारी (ता. २६) सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसला. कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यांतील काही गावांमध्ये गारपीट, वादळीवारा, विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वैभववाडीतील गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com