
शिरंगे या जुन्या गावी तिलारी धरणाला लागून काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन सुरु आहे. ते तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन दिलेले होते.
दोडामार्गः तिलारी धरण (Tilari Dam) क्षेत्राच्या परिसरात असलेल्या शिरंगे गावातील काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी धरणालगत असलेल्या परिसरात आज सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. महसूल विभागाने उपोषणकर्त्यांना कार्यवाही करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, खाणी तात्काळ बंद करा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांनीच येथे यावे, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.