esakal | शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळात शिवसेना-भाजपमध्ये राडा
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या वर्धापनदिनी  कुडाळात शिवसेना-भाजपमध्ये राडा

शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळात शिवसेना-भाजपमध्ये राडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ(सिंधुदुर्ग) : शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik)यांनी पेट्रोल सवलतीत आणि भाजपवाल्यांना मोफत देण्याच्या विषयावरून येथे शिवसेना-भाजपमध्ये (shiv sena and bjp) वाद झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शहरात यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मध्यस्थीसाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला.(shiv-sena-and-bjp-party-workers-fighting-in-kudal-sindhudurg-marathi-news)

शिवसेनेच्या वर्धापनदिनी आज कुडाळ शहरात 100 रूपयात 2 लीटर पेट्रोल देण्याचे व भाजपच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर मोफत 1 लीटर पेट्रोल देण्याचे आमदार नाईक यांनी जाहीर केले. यासाठी पहिल्यांदा शहरातील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधीत पेट्रोल पंपाचे नाव देण्यात आले; मात्र यावरून होणारा तणाव लक्षात घेवून दुसरा पेट्रोल पंप यासाठी निवडण्यात आला. पोलिसांनी सकाळपासून राणेंशी संबंधीत पेट्रोलपंपावर कडक बंदोबस्त ठेवला. या पंपाच्या परिसरात भाजपचे कार्यकर्ते जमले.

हेही वाचा- दक्षिण कोंकणातील वातावरणातील बदल टिपणार आता 'रडार'

दुपारी आमदार नाईक या भागातून जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी केली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. आम्ही विधायक काम करत असताना भाजपने रडीचा डाव खेळल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.

loading image