
शिवसेनेच्या नाटळ आणि हरकुळ बुद्रूक विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला
कणकवली - भाजप पक्षासोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेची सिंधुदुर्गसह कोकण आणि महाराष्ट्रात दमदार वाटचाल सुरू आहे. पक्ष संघटना सातत्याने वाढत आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कनेडी येथे केले.
तालुक्यातील कनेडी येथील समाधी पुरुष सभागृहात शिवसेनेच्या नाटळ आणि हरकुळ बुद्रूक विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला. यावेळी सावंत बोलत होते.
दरम्यान, यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 102 जण सहभागी झाले. या कार्यक्रमात भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम पालव, अल्पसंख्याक विभागाचे निसार शेख, नगरसेवक सुशांत नाईक, विभागप्रमुख बंड्या रासम, आनंद आचरेकर, जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी डिचवलकर, स्वरूपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, प्रदीप सावंत, मीनल तळगावकर, अंजली सापळे, डॉ. विजय गावकर, माधवी दळवी आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या समस्या जाणा
सावंत म्हणाले, शिवसेना सत्तेवर असतानाच कोकणचा खऱ्या अर्थाने विकास झाला. कोकणातील सर्वसामान्य घरातील व्यक्तींना नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आदी पदे मिळाली. आता बाळासाहेबांचाही वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यामुळे कोकणच्या विकासाचा बॅकलॉग निश्चितपणे भरून येईल. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. यातून शिवसेनेचा आणखी विस्तार होणार आहे.
संपादन - धनाजी सुर्वे