"दोन महिन्यांत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना ही जीवाभावाची आणि बाळासाहेबांची संघटना आहे. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे."
ओरोस : मी महायुती मानणारा आहे. महायुतीचे आम्ही घटक आहोत, मात्र माझी संघटना मला एक नंबर करायची आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची (Shiv Sena) संघटना कशी असते हे सिंधुदुर्गात जाऊन पाहा, असे पूर्ण महाराष्ट्र म्हणेल. अशी संघटना मी उभारणार आहे. आजचा कार्यकर्ता मेळावा ताकद दाखविण्यासाठी, अस्तित्व दाखविण्यासाठी किंवा शक्ती प्रदर्शनासाठी नाही, तर मी जेथे असतो तेथे प्रामाणिक असतो, हे दाखविण्यासाठी आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले.