'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची त्यांनी किंमत केली, हे दुर्दैवी'; आमदार साळवींची हताश प्रतिक्रिया

माझ्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला.
Shiv Sena MLA Rajan Salvi
Shiv Sena MLA Rajan Salviesakal
Summary

'ते आसन मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या परवानगीने माझ्या निवासस्थानी आणले.'

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्यांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले; परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेना भवन, दादर येथे शिवसेना (Shiv Sena Bhavan) चालवली, वाढवली, आज राज्यकर्ते झालेल्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने घरातील आसनांची किंमत ठरवावी, हे दुर्दैवीच, अशी हताश प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली.

Shiv Sena MLA Rajan Salvi
'हायकमांड, मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला तरी, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'; काँग्रेस आमदाराची मोठी घोषणा

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत रूजवली. ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या परवानगीने माझ्या निवासस्थानी आणले असून, मी (Rajan Salvi) त्याची नित्यपूजा करतो.

Shiv Sena MLA Rajan Salvi
रत्नागिरीत छत्रपती संभाजी राजेंचा महाराष्ट्रातील सर्वांत उंच पुतळा; काय आहे खासियत, किती आला खर्च?

माझा चिरंजीव अथर्व याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेने त्यांचे एक सुंदर चित्र रेखाटले. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो; माझ्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्या आसनाला व फोटोला मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो. त्याची किंमत ठरवली, हे खूप दुर्दैवी आणि क्लेशजनक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com