चाकरमान्यांनो गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या ; यांनी केले आवाहन....

राजेश कळंबटे
शुक्रवार, 31 जुलै 2020

बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाईन पाळावाच लागेल...

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या, असं आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना केलं आहे.

मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यानी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवाला कोकणात आपल्या गावी यावं, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळेच चाकरमान्यांसाठी एसटी बस सेवा सुरु करण्यास उशीर होत असल्याचही खासदार राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा- मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण -

बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाईन पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भावनेच्या भरात चाकरमान्यांबाबत निर्णय घेणे, योग्य ठरणार नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोकणात येणाऱ्यांपैकी कोरोना संशयितांची रॅपिड टेस्टही केली जाणार आहे.

हेही वाचा-अटकपूर्व जामीन फेटाळला, तुरुंग अधीक्षक अडचणीत, काय आहे प्रकरण? -

 

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1746 आहे. त्यापैकी 1133 बरे झाले असून आजपर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 380 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 263 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत मृत्यू 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP Vinayak Raut ganesha festival appeal for kokan people