esakal | कोकणात शिवसेना सुसाट ; अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला

बोलून बातमी शोधा

shiv sena ratnagiri gram panchayat election}

सरपंच, उपसरपंचपदासाठी तालुक्यात जोरात रस्सीखेच झाली. रत्नागिरी तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

कोकणात शिवसेना सुसाट ; अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला
sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - तालुक्यात सरपंच, उपसरपंचपदाच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुका आज झाल्या. 28 ग्राममपंचायतींवर सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. यामध्ये 20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. सेना तालुक्यातील मोठा पक्ष असल्याचे पुन्हा एकाद निश्‍चित झाले. चार ग्रामपंचायती भाजप तर तीन ग्रामपंचायती गाव पॅनेलकड गेल्या. 17 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित ग्रामपंचायतीत हात वर करून निवड झाली.

सरपंच, उपसरपंचपदासाठी तालुक्यात जोरात रस्सीखेच झाली. रत्नागिरी तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात जाणारे हे निश्‍चित होते. आज निकाल हाती आल्यानंतर शिवसेनाच तालुक्यातील मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले. नांदिवडे, वाटद, कासारी, मिर्‍या या चार ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या. शिवारआंबेरे, ओरी, सोमेश्‍वर या तीन ग्रामपंचायतीवर गावपॅनेलचे सरपंच, उपसरपंच झाले.  
20 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. 

हे पण वाचा ह्दयद्रावक : शनिवारी झाला वाढदिवस अन् रविवारी घेतला जगाचा निरोप; आर्मीत जायचे स्वप्न अधुरेच

28 ग्रामपंचायतीवर बसलेले सरपंच, उपसरपंच अनुक्रमे असे 

मजगाव- फैयाज फकीर महंमद मुकादम, आरजू मेहबुब मुकादम, मिरजोळे- संदीप नाचणकर, राहुल पवार, शिवार आंबेरे- राजन रोकडे, नंदकुमार मोर्ये, पावस- आरोही गुरव, प्रवीण शिंदे, पाली- सरपंचपद रिक्त, उपसरपंच संतोष धावडे, खेडशी- निरंजन सुर्वे, मानसी पेडणेकर, ओरी- आकांशा देसाई, संकेत देसाई, गोळप- मिताली भाटकर, जिगरमियाँ पावसकर, कासारी- दर्शना बेनेरे, संदेश महाकाळ, हातखंबा- जितेंद्र तारवे, सुनील डांगे, सैतवडे- सागर कदम, फरजाना पटेल, वरवडे- विराग पावसकर, गजानन हेदवकर, कोतवडे- तुफील पटेल, संतोष बारगुडे, गणपतीपुळे- कल्पना पकये, महेश केदार, वाटद- अंजली विभुते, सुप्रिया नलावडे, चवे- दीपक गावणकर, रेखा यादव, नांदिवडे- आर्या गडदे, विवेक सुर्वे, नाचणे- ऋषिकेश भोंगले, निलेखा नाईक, नाणीज- गौरव संसारे, राधिका शिंदे, चाफे- श्रद्धा गवळकर, अनिता कोकरे, सोमेश्‍वर- नाझिया मुकादम, उत्तम नागवेकर, आगरनरळ- अनुष्का खेडेकर, अशोक गोताड, मिर्‍या- आकांशा कीर, उषा कांबळे, नेवरे- दीपक फणसे, कोमल भैरे, कशेळी- दीपक बावकर, चंद्रकांत कांबळे, उक्षी- किरण जाधव, मंगेश नागवेकर. ओरी, वाटद, नाणीज, कासारी, कशेळी, मिर्‍या, नेवरे, उक्षी या ग्रामपंचायतीत हात वर करून निवड झाली.

संपादन - धनाजी सुर्वे