अमित शहा व नारायण राणें या दोन समविचारी व्यक्ती, जोडी लाईफ टाईम राहावी; शिवसेनेच्या खासदाराकडून खोचक शुभेच्छा

Shiv Sena Secretary MP Vinayak Raut criticize amit shah sinshusurg political news
Shiv Sena Secretary MP Vinayak Raut criticize amit shah sinshusurg political news

ओरोस (सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय गृहमंत्री सिंधूदुर्ग, महाराष्ट्राला काहीतरी देतील, त्या अनुषांगिक बोलतील. केंद्राकडे महाराष्ट्राचे जीएसटीचे अडकलेले साडे सत्ताविस हजार कोटी तसेच अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो कोटी रूपयांच्या प्रस्तावावर बोलतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा दौरा केवळ शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच आयोजित  होता, असे त्यांच्या भाषणावरुन स्पष्ट होत आहे, अशी खरमरीत टिका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यानी सोमवारी अमित शहा याच्यावर पत्रकार परिषदेत केली.

तळगाव येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत खा राऊत यानी गृहमंत्री शहा याचा खरपुस समाचार घेतला. रविवारी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यास आलेल्या शहा यांना शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे विषयच सापडला नाही. अर्थात देशाच्या गृहमंत्री यांना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची वेळ येते. यातच मुख्यमंत्री ठाकरे यांचे यश आहे, अशी खोचक टिपणी सुद्धा यावेळी खा राऊत यानी लगावली. यापुढे जावून खा राऊत यानी 'स्वार्था पुरते दुसऱ्याला वापरून घ्यायचे आणि विश्वासघात करायचा, अशी ख्याती आहे. अटलबिहारी, प्रमोद महाजन यानी ३३ पक्षांचा समन्वय साधुन स्थापन केलेल्या एनडीए मधील अकाली दल सारखे पक्ष मंत्री पदाचा त्याग करून गेले. सर्वच पक्ष सोडून गेले असून एनडीएमध्ये केवळ भाजप उरणार आहे. यावरून कृतघ्न कोण ?' हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

  
बाळासाहेबांमुळे मोदी, शहा दिसत आहेत

  शहा यांनी ज्याला बंद खोली म्हटली आहे ते संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर आहे. या मंदिरात अनेक चर्चा झाल्या. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे जीवंत नाहीत. परंतु लालकृष्ण अडवाणी त्याचे साक्षीदार आहेत. त्याच दैवत असलेल्या बाळासाहेब यांच्या आशीर्वादामुळे नरेंद्र मोदी, शहा आज दिसत आहेत. गोध्रा हत्याकांडामध्ये बाळासाहेब पाठीशी राहिले नसते तर आज हे दोघी कुठे असते, ते समजू शकले नसते, असा आरोप यावेळी खा राऊत यानी केला.


म्हणून महाविकास आघाडी सोबत

 नरेंद्र मोदी यांचा फोटो ज्या प्रचार सभेत होता. त्याच बँनरवर बाळासाहेब याचा फोटो होता. त्यामुळे मोदींमुळे सेनेचे आमदार निवडून आले, असे म्हणणे चुकीचे आहे.  प्रचार सभेत भांडत बसायचे नसते. त्यामुळे शहा यानी दिलेल्या शब्दाचा आम्ही उच्चार केला नाही किंवा फडणवीस यांच्या नावाला विरोध केला नव्हता. दिलेला शब्द भाजपने पाळावा म्हणून त्यांच्या पाठिमागे आरती घेवून फिरणे आम्हाला योग्य वाटले नाही. मोदी, शहा यांच्या मगृरी स्वभावाला वेसन घालणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, असाही प्रतिटोला शहा यांना लगावला. 


शहा, राणे जोडी लाईफ टाईम रहावी

 अमित शहा व नारायण राणें या दोन समविचारी व्यक्ती आहेत. या दोन्ही व्यक्ती एकत्र आल्या आहेत. आता या दोघांनी लाईफ टाईम एकत्र रहावे, अशा खोचक शुभेच्छा यावेळी खा राऊत यानी दिल्या.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com