
दोडामार्ग : साटेली-भेडशी उपसरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेने तालुका भाजप आणि पक्षांतर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप करत नाराजी व्यक्त केली. येथील भाजप तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना खोटी माहिती देऊन प्रवेश घेणे थांबवावे. अन्यथा, आठ दिवसांत आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई यांनी तालुका भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.