
-अमित गवळे
पाली : पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, विधानसभेत गेल्या चार दिवसांपासून विरोधक विविध प्रश्नावरून आक्रमक होत सरकारला धारेवर धरत आहेत. अशावेळी विधानसभेत वर्सोवाचे शिवसेना उबाटाचे आमदार हारून खान यांनी थेट सुधागड तालुक्यातील वीज समस्येवर विधिमंडळात आवाज उठवला. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मात्र अशा ज्वलंत प्रश्नावर येथील स्थानिक आमदारांनी आवाज न उठवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मात्र असंतोष आहे.