छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापूर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपूरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव करत.
संगमेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शृंगारपूरवर केलेल्या स्वारीची माहिती देणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक मोडी कागद उजेडात आला आहे. मिरज येथील मोडी अभ्यासक स्वरा मराठे यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यातून या स्वारीसंबंधी नवी माहिती प्रकाशात आली आहे.