महाड - राज सदरेवरील वेदघोष आणि मंत्रघोष, छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीवरील दुग्ध व जलाभिषेक, रायगडच्या कड्याकपारीत दुमदुमणारा शंखनाद, तुतारीची ललकारी आणि सोबतीला असलेले भगवे फेटे परिधान केलेले हजारो मावळे अशा मंगलमय वातावरणात रायगड किल्ल्यावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी संपूर्ण रायगड शिवप्रेमींच्या उत्साहात न्हाऊन गेला होता.