किल्ले रायगड राज्याभिषेक सोहळ्याने शिवमय...

दिनेश पिसाट
गुरुवार, 6 जून 2019

रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते. 

या सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी कालपासूनच हजेरी लावली होती. शिवराज्याभिषेक समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना यांच्यातर्फे या उत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी सकाळी शिवप्रतिमेची पूजा केली.

वेगवेगळ्या फुलांनी नटलेल्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजदरबारापासून जगदीश्वराच्या मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.  हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी रायगडावर हजारो शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी मराठी जननाचा सागर लोटला होता.

संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा सोहळा पार पडला. खासदार उदयनराजेही या सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivrajyabhishekh Sohala on Raigad