गोव्याचा मुख्यमंत्री इथं येऊन शिवसेनेच्या जागेवर हक्क गाजवतोय, तुमचं चाललंय काय? रामदास कदमांचं भाजपवर टीकास्र

शिवसेनेच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री व पदाधिकारी यांच्यावर पुन्हा तोंडसुख घेतले.
Shivsena leader Ramdas Kadam
Shivsena leader Ramdas Kadamesakal
Summary

खासदार सुनील तटकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रयत्न करतील, असे रामदास कदम यांनी सांगितले.

दाभोळ : युती असताना भाजपकडून (BJP) शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांगा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना, कोण तो रवींद्र चव्हाण तो इथे १०/१५ कोटींची कामे घेतो, कोण तो ठाण्याचा भाजपचा आमदार केळकर इथे येऊन स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भूमिपूजने करतो, कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री इथे येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर हक्क गाजवतो. तुमचे चालले आहे काय? अशी पृच्छा करत रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच भाजपवर टीकास्र सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दापोली (Dapoli) दौऱ्यात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री व पदाधिकारी यांच्यावर पुन्हा तोंडसुख घेतले; मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणात रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर केलेल्या टीकेची दखल तर घेतली नाहीच, शिवाय रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल, त्याला आपल्याला निवडून द्यावयाचे आहे तसेच मोदींचे हात बळकट करायचे आहेत, असे सुनावले.

Shivsena leader Ramdas Kadam
Loksabha Election : शाहू छत्रपतींबद्दल आदरच, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू - मुश्रीफ

या मेळाव्यात श्री. कदम यांनी उद्धव ठाकरे, माजी मंत्री अनंत गीते यांच्यावरही टीका केली. शिवसेनेचे दापोलीतील आमदार योगेश कदम यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांची अखेरची फडफड सुरू असल्याचे ते म्हणाले.

भाजपची अनुपस्थिती

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपच्या राज्यातील मंत्री व पदाधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नव्हते. केवळ शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Shivsena leader Ramdas Kadam
'कागल' ठरणार लोकसभेचा केंद्रबिंदू; समरजित घाटगेंना भाजपची उमेदवारी शक्य, शिवसेनेकडून मंडलिकांसाठी दावा

तटकरेंचाही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी टाळलाच

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना दापोली विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देऊ. खासदार सुनील तटकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रयत्न करतील, असे रामदास कदम यांनी सांगितले; मात्र शिंदे यांनी तोही विषय टाळला. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो उमेदवार दिला जाईल, त्याला आपल्याला निवडून द्यावयाचे आहे, असे सांगत उमेदवार वेगळा असू शकतो, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com