शिवसेना-राष्ट्रवादीचं आव्हान; काँग्रेसनं जिंकलेली नगरपंचायत भाजपची

नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ चारच जागा आल्या.
politics
politicsesakal
Summary

नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ चारच जागा आल्या.

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणूकीत सत्ता काबीत करण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले; मात्र राजकीय डावपेच, कार्यकर्त्यांमधील नाराजी, विरोधकांमधील कच्चे दुवे अचूक ओळखून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे कडवे आव्हान असतानाही तत्कालीन स्थितीत काँग्रेसमध्ये असलेल्या आमदार नीतेश राणे यांनी नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली; मात्र काँग्रेसचा आनंद अल्पकाळ टिकला. पुढे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप असा प्रवास झाल्याने काँग्रेसने जिंकलेली नगरपंचायत आपोआपच भाजपची झाली.

नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ चारच जागा आल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. १० जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याने त्यांच्याकडे निर्विवाद बहुमत होते. त्यामुळे नगराध्यक्ष होण्यामध्ये कोणताही अडसर नव्हता आणि कोणाचा नगराध्यक्ष होणार याची उत्सुकताही नव्हती.

politics
महाआघाडीची राजकीय गणित बदलली; शिवसेनेच्या आमदाराला बसणार धक्का?

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर निवडून आलेल्या पहिल्याच नगरसेवकांमधून देवगड जामसंडे शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार याची सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र प्रचंड उत्सुकता होती. भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांचा मुलगा आणि माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे यांचा नातू अ‍ॅड. अभिषेक गोगटे यांचा पराभव करून काँग्रेसमधून विजयी झालेल्या योगेश चांदोस्कर यांना पहिला नगराध्यक्ष करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

अनेकांना याबाबत कमालीची उत्सुकता होती. मात्र तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या राजकीय धक्कातंत्राची सर्वत्र ओळख असल्याने नगराध्यक्ष पदाबाबतची उत्सुकता शिगेला पोचलेली असताना देवगड पंचायत समितीच्या माजी सभापती, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा आणि जनमानसातील चेहरा म्हणून ओळ असलेल्या नगरसेविका प्रियांका साळसकर यांना पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

प्रशासन, नागरिक आणि पक्षीय नेतृत्व यांच्याशी योग्य समन्वय राखत त्यांचा कारभार सुरू झाला. पुढे राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविकेने काँग्रेसची जवळीक केली. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ अधिक मजबूत झाले. पक्षीय ध्येय धोरणानुसार आणि नगरपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने पाच वर्षात चार नगराध्यक्ष झाले.

politics
'पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता मिळाल्यास बारामतीसारखा विकास करु'

विधानसभा निवडणूकीवेळी आमदार नीतेश राणे भाजपवासी झाले आणि नगरपंचायतीचर भाजपची सत्ता आली. त्यामुळे सुरूवातीला विरोधात वावरलेल्या भाजपच्या नगरसेवकांपैकी राजेंद्र वालकर यांची उपनगराध्यक्षपदी आणि प्राजक्ता घाडी यांची नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापतीपदी वर्णी लागली. यशावकाश अपक्ष नगरसेवकानेही भाजपमध्ये उडी घेतली आणि नगरपंचायतीमधील विरोधकांची ताकद कमजोर झाली. आता नगरपंचायतीच्या अखेरच्या टप्यात पुन्हा प्रियांका साळसकर यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.

प्रभागनिहाय पहिले नगरसेवक

प्रभाग १ -संजय तारकर
प्रभाग २ -प्राजक्ता घाडी
प्रभाग ३ -विशाखा पेडणेकर
प्रभाग ४ -नीरज घाडी
प्रभाग ५ -आत्माराम जाधव
प्रभाग ६ -योगेश चांदोस्कर
प्रभाग ७ -उमेश कणेरकर
प्रभाग ८ -विकास कोयंडे
प्रभाग ९ -प्रणाली माने
प्रभाग १० -श्रुती जाधव
प्रभाग ११ -साक्षी वातकर
प्रभाग १२ -प्रियांका साळसकर
प्रभाग १३ -रोहिणी तोडणकर
प्रभाग १४ -हर्षा ठाकूर
प्रभाग १५ -राजेंद्र वालकर
प्रभाग १६ -उज्वला अदम
प्रभाग १७ -बापू जुवाटकर

पाच वर्षातील नगराध्यक्ष

प्रियांका साळसकर
योगेश चांदोस्कर
प्रणाली माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com