शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab_Uday Samant
शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज

शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज

मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अनेक काळापासून शिवसेनेमध्ये धुसफूस सुरु होती. कोकणातील नेते परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारभारावर स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. यापार्श्वभूमीवर ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यंमत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनिल परब, उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची उपस्थिती आहे. (ShivSena office bearers angry with Uday Samant, Anil Parab CM Thackeray invites meeting)

कोकण किंवा रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी इथं घडत आहेत, त्यावरुन अशा प्रकारची बैठक होऊ शकते याची कल्पना येत होती. पालकमंत्री अनिल परब हे केवळ जिल्ह्यात झेंडावंदना पुरते येतात. निधी वाटपात त्यांचा दुजाभाव असतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क नसतो, अशा तक्रारी पदाधिकाऱ्यांमध्ये आहेत.

त्याचबरोबर उदय सामंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना इथं कसा पाठिंबा देतात आणि निवडून आणतात याची माहिती देणारा खुद्द सामंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं असं असेल तर इथं आम्ही करायचं काय? असं शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, चार तास ही बैठक सुरु होती, यामध्ये अनिल परब आणि उदय सामंत यांच्याविरोधात नाराजी दिसून आली. येत्या काळात कोकणात शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. याद्वारे कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सागण्यात येत आहे.

Web Title: Shivsena Office Bearers Angry With Uday Samant Anil Parab Cm Thackeray Invites Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top