शिवा व सुनंदा यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दहा वर्षांची मुलगी कणकवली येथे राहते, तर दोन मुले ही कुडाळ येथे त्यांच्यासोबत आहेत.
कुडाळ : शहरातील भाजी विक्रेता शिवा नायक याने गळफास घेत आत्महत्या केली नसून, त्याचा खून झाल्याचे येथील पोलिसांनी (Kudal Police) केलेल्या तपासात पुढे आले आहे. अनैतिक संबंधामध्ये बाधा ठरत असल्याने पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिने प्रियकर सीताराम राठोड व त्याचे नातेवाईक अजित चव्हाण व आदिक चव्हाण यांच्या मदतीने खून (Murder Case) करून आत्महत्येचा बनाव रचल्याची कबुली दिल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.