चपलांच्या दुकानाला आग: कापडाने घेतला पेट आणि बघता बघता संम्पूर्ण दुकान झाले खाक

राजेश कळंबटे
Sunday, 13 December 2020

रस्त्यालगतच्या चपलांच्या दुकानाला लागली आग

रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप येथे नेक्सा शोरूम समोर रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या चप्पलच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातीला कपड्यांनी पेट घेतला आणि मध्यरात्रीच्या वाऱ्याने ती आग वेगाने भडकत गेली.

याची कल्पना रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला देण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचा बंब घटनास्थळी पाठवण्यात आला. रनपच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवली असली तरी या आगीत दुकानातील माल मोठ्या प्रमाणावर जळाला .काही दिवसांपूर्वीच साळवी स्टॉप येथील रस्त्याच्या बाजूलाच अगदी कडेला हे चपलेचे तंबू वजा दुकान टाकण्यात आले असून नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतून ते आश्चर्यकारकरित्या सुटले आहे. हे व्यापारी बाहेरून आले आहेत.

हेही वाचा- एसटी महामंडळ बंदचा घाट ः तेली -

शनिवारी रात्री या दुकानाला बाहेरून लावलेल्या कापडाने पेट घेतला आणि बघता बघता सम्पूर्ण दुकान पेटले . रस्त्यालगत आगीचे लोळ उठल्याने एकच गडबड उडाली . आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रनपच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले मात्र या आगीत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाला.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shoe store caught fire ratnagiri