esakal | आता मोबाईल वापरा जरा जपुनच !
sakal

बोलून बातमी शोधा

shortage of mobile parts causes corona and lockdown in ratnagiri

एक - दोन दिवसांत होणाऱ्या दुरुस्तीसाठी पंधरा दिवस ते महिना लागत आहे.

आता मोबाईल वापरा जरा जपुनच !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : बाजारपेठेत मोबाईलच्या सुट्या भागांच्या कमतरतेमुळे व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक - दोन दिवसांत होणाऱ्या दुरुस्तीसाठी पंधरा दिवस ते महिना लागत आहे. टंचाईमुळे सुट्या भागांचे भावही वधारले आहेत.

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर चिपळुणातील मोबाईल खरेदी - विक्री आणि दुरुस्तीची दुकाने दिवसभर खुली झाली; मात्र मोबाईलसारख्या रोजच्या वापरातील वस्तूच्या सुट्या भागांच्या कमतरतेने या व्यवसायातील व्यावसायिकांना पुन्हा एकदा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक टंचाईमुळे नवीन मोबाईल, लॅपटॉप खरेदी करण्याऐवजी आहे तेच उपकरण दुरुस्त करून वापरण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल वाढला आहे; मात्र सुट्या भागांच्या कमतरतेने त्रासात वाढ झाली आहे.

हेही वाचा - या गावात भरपूर सागवान असूनही घरासाठी लाकडं वापरत नाहीत; इथे सापही मारला जात नाही...

डिसेंबरमध्ये भरलेला माल मार्च, फेब्रुवारीअखेर संपत आला होता. तेव्हाच व्यापाऱ्यांनी नवीन मागणी नोंदवली होती. परंतु मार्चमध्ये टाळेबंदी आल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. सध्या एकूणच दळणवळणाच्या सुविधांमध्ये अनेक अडचणी असल्याने माल उपलब्ध करण्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे मुळातच टंचाई असलेल्या अशा सुट्या भागांची किंमत काहीवेळा वाढत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. चीनमधून आयात होणारा माल बंदरातून सर्व सोपस्कार पार करून बाहेर येण्यास सध्या विलंब लागत आहे. 

"मोबाईल दुरुस्तीसाठी आवश्‍यक असणाऱ्या मालाची सध्या टंचाई आहे. मागणीच्या तुलनेत केवळ २५ टक्के माल उपलब्ध होत आहे. आपल्याकडे येणारे मोबाईलचे ९० टक्के सुटे भाग चीनमधून येतात. त्यामुळे सुट्या भागांची कमतरता आहे."

- स्वप्नील करंजकर, मोबाईल विक्रेता 

हेही वाचा - कोकणात ऐन सणात भाजी महागणार ? 

"पाच महिन्यांहून अधिक काळ अनेकांना घरूनच काम करावे लागत आहे. परिणामी घरातील लॅपटॉप, डेस्कटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लॅपटॉपच्या दुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे; मात्र मोबाईलचे सुटे भाग मिळत नसल्याने ग्राहकांना परत पाठवण्याची वेळ येत आहे."

 - महेश बापट, चिपळूण

संपादन - स्नेहल कदम