Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अष्टविनायक तीर्थक्षेत्रांत उमटू लागले आहेत.
shri ballaleshwar devasthan annachatra

shri ballaleshwar devasthan annachatra

sakal

Updated on

पाली - जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अष्टविनायक तीर्थक्षेत्रांत उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने, प्रसिद्ध अष्टविनायक गणपती मंदिर 'श्री बल्लाळेश्वर देवस्थान'चे अन्नछत्र सद्यस्थितीत बंद झाले आहे. यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांच्या अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, लोकप्रिय असलेला प्रसादाचा लाडूदेखील मिळणे बंद झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com