श्रीवर्धनमध्ये सरपंच व सदस्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीवर्धनमध्ये सरपंच व सदस्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणेरे - श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत खोटी माहिती दिल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 

कुडगावच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणूकमध्ये सरपंच प्रमिला मेंदाडकर व सदस्य जगन्नाथ खरगावकर या दोन सदस्यांवर दिघी सागरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात एजाज हवालदार यांनी तक्रार केली होती. महिला सरपंच प्रमिला यांच्या पतीच्या नावे जमीन असताना, स्वतःची जमीन व जागा नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. हवालदार यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे दाखवून प्रमिला मेंदाडकर यांचे पती विनोद यांची कुडगाव व हरवीत येथे जमीन असल्याचे सिद्ध केले. कुडगाव ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांनी देखील ग्रामपंचायत निवडणुकीतील शपथपत्रात स्वतःवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे नमूद केले होते. मात्र एजाज हवालदार यांनी केलेल्या तक्रारीवरून तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत खरगावकर यांच्यावर दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सिद्ध झाले. 

कुडगाव च्या दोन्ही सदस्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुकीसंदर्भात खोटी माहिती देणे, शपथेवर खोटी माहिती देणे व कोणत्याही प्राधिकृत अधिकाऱ्यास खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. 

आपले सरकार वरून तक्रार - 
एजाज हवालदार यांनी खोटी माहिती देणाऱ्या सदस्यांची तक्रार 'आपले सरकार' पोर्टल वर ऑनलाइन केली होती व त्याचे लगेचच निरसन झाले. याबद्दल हवालदार यांनी शासनाच्या या ऑनलाइन तक्रार प्रणाली चे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com