esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे प्रशासन सज्ज

बोलून बातमी शोधा

Sindhudurg administration alerted due to corona virus

कोरोना व्हायरस हा आजार सध्या चीन देशातून इतरत्र पसरत आहे; मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नाही. तरीही खबरदारीच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरीकांनी या आजाराची भिती बाळगू नये. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. प्रत्येकाने स्वच्छतेवर भर देवून स्वतःचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे प्रशासन सज्ज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - कोरोना व्हायरस हा आजार सध्या चीन देशातून इतरत्र पसरत आहे; मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नाही. तरीही खबरदारीच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरीकांनी या आजाराची भिती बाळगू नये. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. प्रत्येकाने स्वच्छतेवर भर देवून स्वतःचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केले. 

कोरोना व्हायरस हा आजार सध्या चीन देशातून अन्यत्र पसरत आहे. या आजाराचे प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधोपचार यांच्या मार्गदर्शक सुचना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय चाकोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा माहिती सहाय्यक हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते. 

के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ""सिंधुदुर्गसह महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रूग्ण निश्‍चित झालेला नाही. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच करावी. दिवसातून किमान चार ते पाच तास वेळा स्वच्छ पाण्याने हॅण्ड वॉश किंवा साबणाचा वापर करून हात धुवावेत. स्वतःची स्वच्छता राखल्यास या आजारापासून घाबरण्याचे कारण नाही. जिल्ह्यात या आजाराचा एकही रूग्ण नसला तरी प्रशासन खबरदारी घेत आहे. जनतेनेही आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून दक्षता घ्यावी.'' 

अशी घ्यावी दक्षता 
नागरिकांची आजाराची भीती बाळगू नये व कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, सोशलमिडियावर चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेवू नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, शिंकताना, खोकताना तोंडावर व नाकाकडे स्वच्छ रूमाल धरावा. हस्तांदोलन शक्‍यतो टाळावे. एकमेकांशी बोलताना किमान एक हात अंतर असावे, रूग्णालयात आजारी असलेल्या व्यक्‍तींशी जवळचा संपर्क ठेवू नये, गरजेनुसार स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, सर्दी खोकला असलेल्या व्यक्‍तींशी जवळचा संपर्क ठेवू नये, आजारी असताना घरीच थांबावे. स्वच्छ व शुद्ध पाणी प्यावे, घरात सर्दी, खोकला, आजार असलेली व्यक्‍ती असल्यास त्यांना मास्क द्यावेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग क्र.02362-228847 व वैद्यकीय मदतीसाठी (02362-228901) जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.